Latest Marathi News

BREAKING NEWS

कोणत्याही मालमत्तेवर किंवा संपत्तीवर दावा करायचा नाही, सेने भवनाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री स्पष्ट बोलले

0

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना भवनावर शिंदे गटाकडून दावा केला जाणार असल्याची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयी महत्वपूर्ण विधान केले आहे.मुख्यमंत्र्यांनी शिवसेना भवनावर दावा करणार नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेनेच्या कोणत्याही मालमत्तेवर आणि संपत्तीवर दावा केला जाणार नाही. मालमत्ता आणि संपत्तीचा मोह नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना नाव आणि चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. हा निर्णय मेरीटवर झाला आहे. त्यामुळे त्यावर आक्षेप घेणे चूक आहे. न्यायव्यवस्थेचे काही अधिकार असतात. लोकशाहीत ही संस्था स्वायत्त आहेत. आयोगाच्या निर्णयाचे जनतेने स्वागत केले आहे. मात्र निर्णय बाजूने लागला की चांगला आणि विपरीत लागला की अयोग्य असे म्हणणे चुकीचे आहे. नाव आणि चिन्ह मिळाल्याने विधिमंडळाचे कार्यालय ताब्यात घेतले. मात्र कोणत्याही मालमत्तेवर किंवा संपत्तीवर दावा करायचा नाही. त्याचा मोह नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

भाजप-शिवसेनेने युती म्हणून निवडणूक लढविली. मात्र सत्तेसाठी, खुर्चीसाठी विचारांना तिलांजली देण्यात आली. कोणी काही आरोप करत असले तरी त्यावर बोलायचे नाही. खुर्चीसाठी विचारांना तिलांजली दिल्यानेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे, अशी टीकाही त्यांनी शिवसेनेवर केली.

Leave A Reply

Your email address will not be published.