Latest Marathi News

BREAKING NEWS

कोण रोहित पवार? प्रणिती शिंदेंनी सुनावले खडेबोल

0

सोलापूर | विधानसभा निवडणूक अजून दूर असले तरी आता पासून सोलापूरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आताच शाब्दिक युद्ध पेटले आहे. “कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो” असं म्हणत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांना सुनावलं. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सोलापूर लोकसभेबद्दल वक्तव्य केलं होतं.

रोहित पवारांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेत प्रणिती शिंदेंनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली. “कोण रोहित पवार? ही त्यांची पहिली टर्म आहे काहीजणांमध्ये पोरकटपणा असतो. काही दिवस जाऊ द्या त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी येईल” असं म्हणत प्रणिती शिंदेंनी कडक शब्दांत उत्तर दिलं. तसंच, महाविकास आघाडीतील नेत्यांवर शाब्दिक आणि आता शारिरीक हल्ले होत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो. सरकार या हल्ल्यांकडे गांभीर्याने पाहत नाही अशा कडांक शब्दात शिंदे फडणवीस सरकारला सुनावले.

आज महिला आमदारांवर हल्ले होतात, ती ही एकटे असताना त्या मागचे कारण शोधले पाहिजे. महिला आमदारांवर असे हल्ले होत असतील तर सर्वसामान्यांचे काय?असा सवालही शिंदेंनी उपस्थितीत केला. -राहुल गांधींनी वस्तुस्थितीवर भाषण संसदेत केले आहे. मोदी यांनी याबाबत उत्तर देणे त्यांचे कर्तव्य आहे. ते या सगळ्यानंतर इन्सिक्यूर झाले आहे.आतापर्यंत त्यांना कधी चिडलेल पाहिलेलं नाही. मात्र राहुल गांधीच्या भाषणानंतर ते अनस्टेबल झाले आहे. त्यांच्यावर किती परिणाम झालेत हे यातून दिसत आहे, अशी टीकाही शिंदेंनी मोदी सरकारवर केली.

Leave A Reply

Your email address will not be published.