कोल्हापूरमध्ये गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आल्यानंतर आतापर्यंत या प्रकरणात 18 संशयितांची नावे समोर आली असून यामधील 14 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. गर्भलिंग निदान रॅकेटने अवघा जिल्हा पोखरला असून भुदरगड तालुक्यातून या प्रकरणाला वाचा फुटली होती. हा संपूर्ण प्रकार बोगस डाॅक्टर आणि त्यांच्या एजंटाकडून चालवला जात असल्याचे पोलिसांच्या तपासावरून दिसून येते.
गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणी राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधानगरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी बुधवारी रात्री बोगस डॉक्टर आणि एजंटला अटक केली. बोगस डॉक्टर विठ्ठल हिंदराव निकम आणि एजंट संजय आप्पासो गोंधळी अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. त्यांना न्यायालयात त्यांना हजर केले असता 28 फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावनात सुनावण्यात आली आहे.
सदर या गुन्ह्यात एकूण 18 संशयतांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यापैकी 14 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आल्याची माहिती राधानगरी पोलिसांनी दिली आहे. या गुन्ह्यातील गजेंद्र उर्फ सनी बापूसो कुसाळे, ओंकार कराळे, राजेंद्र यादव आणि डॉक्टर प्रसाद ढेंगे हे चौघे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.