कोल्हापूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निकालाचा पहिला कल हाती आला आहे. कागल तालुक्यातील बामणीत भाजपने गुलाल उधळला आहे. बामणीमध्ये सत्तांतर झाले आहे. भाजपचे नेते समरजीत घाडगे यांनी तीन ग्रामपंचायतीमध्ये आपलं वर्चस्व स्थापन केला आहे. बामणीमध्ये समरजीत घाटगे आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ गटामध्ये कांटे की टक्कर होती. या ठिकाणी कोणतीही निवडणूक असली तरी दोन गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होते.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही घाटगे गटाने बाजी मारली आहे. सरपंचपद पटकावले आहे. तसंच, बामणी निढोरी आणि रणदिवेवाडी या कागल तालुक्यातील तीनही गावात भाजपचा झेंडा आहे. कागल तालुक्यात भाजपची घोडदौड सुरूच आहे. तसंच कसबा सांगाव ता. कागल मुश्रीफ गटाला धक्का बसला आहे. सरपंचपदी राजे- मंडलिक गटाने बाजी मारली आहे. करवीर तालुक्यातील कावणे गावात भाजपने झेंडा फडकावला आहे.
कागलनंतर करवीरमध्ये भाजपने खाते खोलले आहे. करवीर तालुक्यात कावणे गावी शुभांगी प्रतापसिंह पाटील (भाजप) सरपंचपदी निवड झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी 1193 उमेदवार सरपंचपदासाठी नशीब आजमावत आहेत तर 8 हजार 995 उमेदवार सदस्य पदासाठी रिंगणात आहेत.
तर बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे राज्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायत बीड जिल्ह्यामध्ये होत असल्यानं जिल्ह्यातील राजकीय नेत्यांची प्रतिष्ठान लागली आहे.