Latest Marathi News

BREAKING NEWS

किशोर आवारेंच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या या आमदाराचा सहभाग असल्याचा संशय

0

पुणे : जनसेवा विकास समितीचे प्रमुख किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. आधी एका हल्लेखोराने त्यांच्यावर पिस्तूलाने गोळ्या झाडल्या. त्यानंतर इतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करुन गंभीर जखमी केले. त्यांना उपचारासाठी रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. या प्रकारानंतर पुणे शहरात खळबळ माजली उडाली. हल्ला झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे.

अशातच किशोर आवारे यांच्या आईने थेट राष्ट्रवादीच्या आमदारावरच हत्येप्रकरणी आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या हत्येचा कट मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी रचल्याचा आरोप आवारे यांच्या आईने केला आहे. एफआयआरमध्ये आमदार सुनील शेळके, त्यांचे भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकरसह अन्य तीन अनोळखी इसमांचा उल्लेख आहे.

या तपासात समोर आलेली माहिती अशी की, सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे आवारेंच्या चार मारेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र त्याला अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नाही. या हल्लेखोरांच्या जबानीतून आमदार शेळकेंना अटक होणार की नाही, हे ठरणार आहे. त्यांचे मोबाईलच संभाषण (सीडीआर) काढून पोलीस तपास करतील. त्यात व हल्लेखोरांच्या जबाबात शेळकेंचे नाव आले, तर मात्र त्यांना अटक करण्यात येईल,असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.