Latest Marathi News

BREAKING NEWS

किरण मानेच्या बायकोला समोर पाहताच राखीने दिली ही रिऍक्शन

0

टीव्ही जगतात सर्वात वादग्रस्त शो म्हणून पहिला जाणारा बिग बॉस हिंदी नंतर मराठीतही बिग बॉस सुरू करण्यात आलं. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनबाबत प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन पाहून फेअर आणि अनफेअरवरून सोशल मीडियावर चांगलंच ट्रोलिंग सुरू आहे. घरातल्या सदस्यांविषयी विविध चर्चा होत असताना आता एक नवीन प्रोमो समोर आला आहे.

आता सगळ्या सदस्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. पण येत्या चावडीवर सगळ्यांना एक खास सरप्राईज मिळणार आहे. नवीन प्रोमोमध्ये या आठवड्यात सदस्यांच्या संयमाचा बांध फुटणार आहे. या प्रोमोमध्ये अपूर्वा नेमळेकर आरोहविषयी म्हणते कि, ‘याला एवढं कळत असतं तर याच्या सीझनमध्येच तो जिंकला असता.’ त्यावर आरोह काहीच प्रतिक्रिया देत नाही.

मात्र आता या आठवड्याच्या चावडीवर सदस्यांना त्यांचे नातलग भेटणार आहेत. अपूर्वा आणि अमृताला भेटायला तिची आई येणार आहे तर किरण मानेची बायको त्यांना भेटायला येणार आहे. आपल्या घराच्या माणसांना पाहताच सगळे सदस्य खूपच भावुक झाले.

अपूर्वा ढसाढसा रडतच आईच्या गळ्यात पडली. तर किरण माने बायकोला पाहून भावुक झाले आणि तिच्या गळ्यात पडून रडू लागले. एरवी राखी सावंतच्या मागे पुढे करणाऱ्या किरण मानेंचा बायकोला पाहून मात्र बांध फुटला.

Leave A Reply

Your email address will not be published.