Latest Marathi News

BREAKING NEWS

केसीआर यांच्या कृतीने पंढरपूरनगरीचा अपमान आहे – रामदास आठवले

0

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आपल्या मुलगा आणि जावयासह संपूर्ण मंत्रिमंडळासह महाराष्ट्रात आहेत. पंढरपूरमध्ये जात ते विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहेत. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलं आहे. केसीआर यांच्या कृतीने पंढरपूरनगरीचा अपमान आहे, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

केसीआर पंढरपूरमध्ये आले आहेत. त्यांनी तिथलं पावित्र्य राखलं जाईल, याची काळजी घ्यावी. पण काल आपण पाहिलं की केसीआर यांच्यासाठी मटणाचा बेत करण्यात आला होता. हे अत्यंत चुकीचं आहे. पंढरीचा अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे. असं आठवले म्हणालेत. त्यांना खायचे असेल तर त्यांनी तेलंगणा मध्ये जाऊन मटण खावं. एकादशी तोंडावर असताना खाणं, हा अपमान आहे, असं ते म्हणालेत.

पुढे आठवले म्हणाले की, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर आहे. त्यांना सुद्धा दर्शनाला यायचा अधिकार आहे. ते आलेत. दर्शन घेतील. याला विरोध असण्याचं कारण नाही. पण या सगळ्याचा फारसा या राज्यात फायदा होणार नाही, असं आठवले म्हणालेत. तेलंगणामध्ये भाजपा आणि टीडीपी एकत्र येऊन केसीआर यांची सत्ता घालवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण बीआरएसचा महाराष्ट्रात फारसा फरक पडणार नाही, असंही ते म्हणालेत.

Leave A Reply

Your email address will not be published.