भारतीय जनता पक्षाच्या दिगवंत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुक लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय पक्षांच्या बैठका पार पडणार असून यावर उमेदवारी निश्चितीवर निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसच्या बैठका पार पडणार असून मनसे, भाजप यांनी आपले उमेदवारांची यादी वरिष्ठांकडे पाठविली आहे.
कसबा पेठ मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इच्छुक उमेदवारांची बैठक होणार आहेत. पुण्यातून कसबा पेठ मतदार संघातून रूपाली पाटील, अंकुश काकडे, रविंद्र माळोदकर, वनराज्य अधिकारी, अण्णासाहेब थोरात अशी नावं समोर आली आहे. या इच्छुक उमेदवारांवर आज राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तेब करण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काॅंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडणार आहे. ही बैठक मुंबई पार पडणार असून कुणाला उमेदवारी देण्यात येईल त्याकडे लक्ष्य लागून राहिलं आहे. या पोटनिवडणुकीकरीता रविंद्र धनंगेकर, अरविंद शिंदे इत्यादी काॅंग्रेसचे नेते इच्छुक आहेत. तर मनसेच्या इच्छुक चौघांची नावे राज ठाकरे यांच्याकडे पाठविण्यात आली आहेत. यामध्ये गणेश सातपुते, अजय शिंदे, निलेश हंडे, आणि गणेश भोकरे अशी नावं पाठवण्यात आली आहे.