Latest Marathi News

BREAKING NEWS

कर्नाटकात भाजपचा जोरदार प्रचार अवघ्या सहा दिवसांत मोदींच्या १५ जाहीर सभा अन् रोड शो

0

कर्नाटक | कर्नाटक विधानसभेचं बिगुल वाजलं असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. कर्नाटकात सध्या राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपनं तर प्रचाराचा धुरळाच उडवला आहे. भाजपचे स्टार प्रचारक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा दिवसांत कर्नाटकात सुमारे 15 जाहीर सभा आणि रोड शो करणार आहेत. ज्यामुळे राज्यातील सत्ता टिकवून ठेवण्याच्या पक्षाच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 एप्रिलपासून कर्नाटकात निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करतील आणि 7 मेपर्यंत ते प्रचारसभा, रोड शो करणार आहेत. कर्नाटक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा दिवसांत 12 ते 15 जाहीर सभा, रॅली आणि रोड शो करणार आहेत. पीएम मोदी 28 एप्रिल, 29 एप्रिल, 3 मे, 4 मे, 6 मे आणि 7 मे अशा 6 दिवसांसाठी प्रचार करणार आहेत. याच सहा दिवसांत पीएम मोदी 12 ते 15 रॅली, जाहीर सभा आणि रोड शो करतील.

काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह झालेले देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर ते कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित राहणार आहेत. “पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमांबाबत भाजप उत्साही आहे. कारण पंतप्रधान मोदींच्या आगमनाने भाजपच्या बाजूनं वातावरण तयार झालं आहे. दरम्यान, कर्नाटक हे दक्षिणेकडील राज्य आहे, जिथे केवळ भाजपची सत्ता आहे

Leave A Reply

Your email address will not be published.