कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाचे नेते मैदानात उतरले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून बसले आहेत. पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी चिंचवडमध्ये बावनकुळे हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.खरं तर ही लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे.
तसेच आपण बिनविरोधसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला विनंती केली होती. पण अखेर निवडणूक लागली. त्यामुळं 26 फेब्रुवारीला कमळासमोरच बटन जोरात दाबा, अजित पवारांना 440 वोल्टचा असा करंटच लागला पाहिजे, की पुन्हा त्यांनी चिंचवडचे नावच घेऊ नये, असा त्यांना धडा शिकवा, असे आवाहन बावनकुळे यांनी मतदारांना केले. या टीकेमुळे राष्ट्रवादी आणि भाजपात वाढ वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे;
चिंचवड मतदारसंघात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. जगताप यांच्या प्रचारासाठी काल दिवसभर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. डबल इंजिन सरकारचा पिंपरी -चिंचवडला मोठा फायदा होणार आहे.अंधेरीची निवडणूक लागली त्यावेळी शरद पवार यानी भाजपने ही निवडणूक लढू नये अशी सूचना केली. आम्ही देखील महाविकास आघाडीला विनंती केली मात्र ती त्यांनी मान्य केली नाही, असे म्हणत बावनकुळे यांनी आघाडीवर टीका केली.