Latest Marathi News

BREAKING NEWS

काका, काका म्हणायचे अन् माझेच खाते घेऊन बसले, रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंना टोला

0

 

पुन्हा एकदा रामदास कांदा यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी खंत व्यक्त केली आहे. इतरांची हकालपट्टी करण्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला शिवसैनिक आहेत की पवारांची माणसं ते पाहा. आमदारांना शिवीगाळ, आक्रमक भाषा वापरली गेली. राष्ट्रवादी सोडावी इतकीच मागणी आमदारांची होती, बंडखोर आमदारांची येण्याची तयारी होती पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही अशी खंत शिवसेनेतून हकालपट्टी केलेले नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली.

रामदास कदम म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांना संपवून १०० आमदार राष्ट्रवादीचे निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. ५१ आमदारांनी हे पाऊल उचललं नसतं तर पुढील निवडणुकीत शिवसेनेचे १० आमदारही निवडून आले नसते. महाराष्ट्राचा खजिना अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी लुटला. प्रशासकीय अनुभव नसल्याने उद्धव ठाकरेंना फसवलं. पक्ष फुटतोय तरी तुम्हाला शरद पवार का हवेत? हा हट्ट कुणाचा आहे? तुमच्या बाजूला पक्षद्रोही आहेत ते ओळखा. बेईमानी आमच्या रक्तात नाही. आम्हाला शिवसेना वाचवायची आहे असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मला आदित्य साहेब म्हणावं लागतं. माझं वय ७० आहे. कारण ते ठाकरे आहेत. मातोश्रीतले आहेत. आदित्य ठाकरेंनी संयम पाळायला हवा होता. जे जे आमदार गेले त्यांनी पक्षासाठी योगदान दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी दिले नाही माणूस कर्तृत्वाने मोठा होता. पक्षासोबत माणसांचेही योगदान आहे. मंत्री बनवला म्हणजे भीक दिली असं नाही हे उद्धव ठाकरेंनी समजू नये असंही रामदास कदम म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.