Latest Marathi News

BREAKING NEWS

ज्याप्रमाणे उद्धव ठाकरेंचा पक्ष नॅनो झाला, त्याप्रमाणे आजचा महामोर्चाही नॅनोचं झाला

0

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवमानकारक वक्तव्ये केली जात आहेत. याच्या निषेधार्ष आज महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत महामोर्चा काढण्यात आला. मोर्च्यातील गर्दी लक्षात घेता हा मोर्चा ऐतिहासिक झाल्याचा दावा शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी केला आहे.

तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नसल्याचे म्हणाले. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मविआचा हा मोर्चा अशस्वी ठरला आहे. कारण पाहिजे तेवढी गर्दी झाली नाही, मविआ मोर्चाला गर्दी जमवण्यात अशस्वी आहे. हा त्यांचा महामोर्चा नव्हता तर नॅनो मोर्चा होता, असे म्हणत फडणवीसांनी आघाडीचा डाव खोडून काढला.

तिन्ही पक्षातील राज्यभरातून कार्यकर्ते आले असतानाही आझाद मैदान एवढी तरी गर्दी मविआ जमवू शकली नाही. तीन पक्ष एकत्र येऊनही इतका छोटा मोर्चा निघाला. ड्रोन शॉट दाखवण्या इतपतही मोर्चा निघाला नाही. यावरुन मविआच्या मोर्चाला लोकांनी प्रतिसाद दिला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मविआने काढलेला महामोर्चा अशस्वी ठरला. त्यामुळे या मोर्चाचं कोणतं विराट स्वरूप उद्धवजींना दिसलं? त्यांचा पक्ष जसा नॅनो होतोय, तसा हा मोर्चाही नॅनोच आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.

Leave A Reply

Your email address will not be published.