Latest Marathi News

BREAKING NEWS

ज्यांनी गुजरात जिंकवले, त्यांची लेक मात्र ग्राम पंचायत हरले; सी.आर.पाटील यांच्या मुलीचा पराभव

0

जळगाव | ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. मतमोजणीचे सुरुवातीचे कलही हाती येऊ लागले आहेत. गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सी.आर.पाटील यांच्या कन्या भाविनी पाटील या जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायद सदस्यपदी विजयी झाल्या आहेत. मात्र त्यांचे ग्रामविकास पॅनल पराभूत झालं आहे. भाविनी पाटील यांच्या ग्रामविकास पॅनलला १० पैकी ३ जागा मिळाल्या आहेत.

भाविनी पाटील यांचे प्रतिस्पर्धी शरद पाटील यांच्या लोकशाही उन्नती पॅनलला दहा पैकी सात जागा मिळाल्या, त्यात लोकनियुक्त सरपंचपदही शरद पाटलांच्या पॅनलला मिळाले आहे. मोहाडी ग्रामपंचायतच्या निकालाकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून होतं. या ठिकाणी भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होती. भाविनी पाटील यांच्या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता, परंतु त्यांच्या पॅनलला पराभव पत्करावा लागला आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपानं यंदा ऐतिहासिक यश प्राप्त केलं. भाजपानं गुजरात विधानसभेच्या १८२ जागांपैकी तब्बल १५६ जागांवर यश प्राप्त केलं. गुजरातचे निकाल जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सर्वप्रथम गुजराज भाजपा प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. सी.आर.पाटील यांच्या नेतृत्वात भाजपाला गुजरातमध्ये मिळालेल्या यशाबाबत मोदींनी अभिनंदन केलं होतं.

Leave A Reply

Your email address will not be published.