Latest Marathi News

BREAKING NEWS

पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी केला वाढदिवसादिवशी मृत्यूनंतर अवयवदान करण्याचा संकल्प

0

आज १० जून वाढदिवसानिमित्त तडवळे गावचे सुपुत्र , डीएसपी न्यूज लाइवचे संपादक , डिजिटल मिडीया संपादक पत्रकार संघ खटाव तालुका सहखजिनदार , पत्रकार श्री.दत्तात्रय फाळके यांनी मृत्यूनंतर देहदानाचा संकल्प केला आहे.

महायुती सरकारने वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मृत्यूनंतर देहदान करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी वाढदिवसादिवशी मृत्यूनंतर देहदान करण्याचा संकल्प केला आहे. देहाचा श्वास संपला म्हणजे तो नाशवंत होत नाही. मृत्यूनंतर अवयव दानातून अनेकांना नवजीवन मिळू शकते. या भावनेने प्रेरित होऊन पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी हा निर्णय घेतला आहे. यासाठी पत्रकार दत्तात्रय फाळके यांनी ऑनलाईन ( शासकीय ) स्तरावरील सर्व कायदेशीर बाबी पुर्ण केल्या असून , मृत्यूनंतर शरीराचे अवयव गरजू रूग्णांसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. अवयव दानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा संकल्प महत्वाचा ठरला आहे. त्यांच्या या संकल्पामुळे अनेकांना जीवदान मिळण्यासाठी मदत होईल. डीएसपी न्यूज लाइव चॅनेलच्या सर्व पत्रकार , पदाधिकारी , तसेच मित्र व हितचिंतकांना पत्रकार दत्तात्रय फाळके यांचे हे पाऊल प्रेरणा देईल असा विश्वास व्यक्त केला आहे. माणसाचे शरीर नष्ट होते परंतु त्यांनी केलेल्या अवयव दानातून कायमस्वरूपी त्या व्यक्तीच्या अखेरच्या श्वासापर्यंत जिवंत राहतात हेच मोठे काम आहे . पत्रकार यांनी आज वाढदिवसादिवशी अवयव दान करण्याचा संकल्प केल्यामुळे त्यांच्या या संकल्पाचे , सामाजिक उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यांनी आज वाढदिवसानिमित्त मृत्यूनंतर अवयव दान करून सर्वांनीच जनजागृती करावी असे आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.