Latest Marathi News

BREAKING NEWS

जिया खान मृत्यू प्रकरणात सुटका झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया

0

अभिनेत्री जिया खानच्या निधनाला 10 वर्षे झाली त्या प्रकरणात आता निर्णय समोर आला आहे. मुंबईच्या स्पेषशल सीबीआयई कोर्टानं जिया खान हीचा कथित प्रियकर सूरज पांचोलीला निर्दोष म्हटले आहे. कोर्टाच्या या निर्णयानं सूरज पांचोलीची आई आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद झाला आहे.तर या सगळ्या प्रकरणात जियाचा आईचं म्हणणं आहे की त्या आता हायकोर्टात जाणार आहे. दुसरीकडे अभिनेता सूरज पांचोलीनं कोर्टानं दिलेल्या या निर्णयानंतर त्यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

सूरजनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सूरजनं सत्याचा कायम विजय होतो, असं म्हटलं आहे. तर त्यासोबत सूरजनं गॉड इज ग्रेट हे हॅशटॅग देखील वापरलं आहे. सूरजची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. कारण 2013 साली जियानं गळफास घेत आत्महत्या केली होती तर त्याच्या तब्बल 10 वर्षांनी आता त्यावर निर्णय सुनावण्यात आला आहे.

राबिया यांनी कोर्टाच्या या निर्णयावर मीडियाशी बोलताना सांगितले की त्यांनी अजून हार मानली नाही. याविषयी बोलताना राबिया म्हणाल्या, अखेरचा न्याय अजून झालेला नाही. पुराव्याअभावी हा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीआयनं त्यांचं काम नीट केलं नाही. माझी मुलगी कशी मेली हा प्रश्न मी अजून परत विचारणार आहे. कारण त्या मागचं सत्य अजून समोर आलेलं नाही. आता मी या प्रकरणात उच्च न्यायालयात जाणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.