ठाणे | राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड सतत वादंगार्स्ट विधाने करता असताना दिसून येतात अशातच आता पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झालीये. द केरळ स्टोरी या चित्रपटाबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.चित्रपटाच्या निर्मात्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी द्या असं त्यांनी म्हटलं होतं. या वक्तव्यानंतर आता त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप पदाधिकाऱ्याच्या वतीनं वर्तकनगर पोलीस ठाण्यात आव्हाडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आव्हाड यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्याकडून करण्यात आला आहे.
द केरळ स्टोरी चित्रपटावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. हा चित्रपट पाच मे रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. चित्रपटावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच आता या वादात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निर्मात्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात यावी असं वादग्रस्त वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. आव्हाड यांच्या या वक्तव्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या चित्रपटाच्या निर्मात्याला सार्वजनिक ठिकाणी फाशी देण्यात यावी असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या चित्रपटामुळे केरळची प्रतिमा डागळली गेली सोबतच राज्यातील महिलांचा अपमान झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाड एका वृत्तवाहिनिशी बोलताना म्हणाले की, या चित्रपटातून असा दावा करण्यात आला आहे की, केरळमधून 32 हजार महिला बेपत्ता आहेत आणि त्यांनी इसीस जॉईन केलं आहे. पण खरा आकडा केवळ तीन असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.