Latest Marathi News

BREAKING NEWS

ज्येष्ठ मराठी अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन

0

कोल्हापूर । मराठी चित्रपट सुटीतील दिग्गज अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. त्यांचं वय 88 वर्षे होतं. अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांवर आपली छाप पाडली आहे. ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी मराठीतील अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारत लोकांच्या मनावर आपला ठसा उमठवला आहे.

कुलकर्णी यांनी थोड्या-थोडक्या नव्हे तर तब्बल 300 सिनेमांमध्ये काम केलं आहे.गेल्या अनेक वर्षांपासून ते चित्रपट सृष्टीपासून दूर होते. भालचंद्र कुलकर्णी हे मूळचे कोल्हापूरचे होते.ते सध्या कोल्हापुरातच वास्तव्यास होते. वयाच्या 88 व्या वर्षी कोल्हापुरातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गाजलेल्या चित्रपटांमध्ये केलंय काम- भालचंद्र कुलकर्णी यांनी नाटक ते चित्रपट दोन्ही क्षेत्रात आपली छाप पाडली आहे.

तसेच त्यांनी मुंबईचा जावई, सोंगाड्या, खतरनाक, असला नवरा नको गं बाई, थरथराट अशा अनेक मराठी गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. त्यांच्या रांगड्या व्यक्तिमत्वाने त्यांनी नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. बातमी अपडेट होत आहे…

Leave A Reply

Your email address will not be published.