Latest Marathi News

BREAKING NEWS

जर सरकारला जमत नसेल तर आम्हाला बेळगावला जाता येते

0

नाशिक जर सरकारला जमत नसेल तर आम्हाला बेळगावला जाता येते असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सचिवांद्वारे महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावमध्ये येऊ नये अशी नोटीस अशी सूचना पाठवलेली त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेनेचे नेते तथा उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर आले आहेत. दरम्यान नाशिक शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. आज अधिक दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी शिंदे भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. सकाळपासुन आज त्यांनी विविध ठिकाणी भेट शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी महाराष्ट्र कर्नाटक वादावर आपली सडेतोड प्रतिक्रया व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.