Latest Marathi News

BREAKING NEWS

जळगावात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर फाडले

0

 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत, ते जिल्ह्यात 3 ठिकाणी बंडखोरांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. यामध्ये मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील आणि चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघाचा समावेश आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच जळगावात राजकारण तापलं आहे.

धरणगावामध्ये अज्ञात व्यक्तींनी आदित्य ठाकरे य़ांच्या स्वागताचे बॅनर फाडल्याची घटना समोर आली आहे. बॅनर फाडल्याने मध्यरात्रीनंतर तणाव निर्माण झाला होता. या घटनेमुळे शिवसैनिक प्रचंड संतप्त झाले होते. पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच धाव घेतली त्यामुळे अनर्थ टळला आहे.

मात्र दुसरीकडे बॅनर फाडल्यामुळे शिवसेना आणि युवासेनेच्या पदाधिकार्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे एकीकडे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झालेली असताना दुसरीकडे शिंदे गटाने थेट शिवसेनेच्या चिन्हावर आपला हक्क बजावत थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे तर दुसरीकडे शिवसेनेकडून सुद्धा शिंदे गटाला जशाच-तसे उत्तर दिले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.