कोल्हापूर |
कोल्हापूर शहर पर्यटन विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री केसरकर यांनी जुना राजवाडा(भवानी मंडप) येथील जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच कोल्हापूर शेतकरी सहकारी संघ इमारतीची भेट देवून पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.
साडेतीन शक्तीपीठापैकी असलेल्या असलेल्या श्री अंबाबाई महालक्ष्मी देवीचे दर्शन कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज घेतले. याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी व्यवस्थापक महादेव दिंडे तसेच मान्यवरी उपस्थित होते.