पुणे,दि:-युवकांचा उद्योग क्षेत्राकडे ओढा वाढावा, नवतंत्रज्ञानासह जागतिक पातळीवरील उद्योग-व्यवसायातील उपलब्ध संधींची, घडामोडींची माहिती व्हावी; या उद्देशाने पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, अमेरिकास्थित गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह 2025 (उद्योजक परिषद) पुण्यात प्रथमच आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत अमेरिका, युनाटेड किंग्डम, जर्मनी, जपान, ऑस्ट्रेलिया तसेच जगभरातील विविध देशांमधून उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील सुमारे 500 व्यावसायिक, नवउद्योजक, कल्पक उद्योजक तसेच गर्जे ग्लोबल संस्थेमार्फत परदेशातील शंभराहून अधिक व्यावसायिक, उद्योजक व मान्यवर सहभागी झाले आहेत. या परिषदेत श्री. चंद्रकांत दादा पाटील हे सहभागी झाले व तेथे उपस्थित विद्यार्थी, नव उद्योजक आणि मान्यवरांना त्यांनी संबोधित केले.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी हे तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे ; यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. मोदीजींनी कौशल्य आधारित शिक्षणावर सर्वाधिक भर दिला आहे. त्यामुळे आज जर्मनी सारखा देश भारताकडे कुशल मनुष्यबळाची मागणी करत आहे. स्टार्ट अप मध्ये भारताने दैदिप्यमान कामगिरी केली आहे, अशी भावना व्यक्त केली.
BREAKING NEWS
- कौटुंबिक स्तरात शाश्वत आनंद, समृद्धी व आत्मिक समाधान कशात ?
- नागपूरमध्ये विधानभवनात अविनाश सोलवट यांची भेट
- कलियुगात प्रचिती दातृत्वाची.!
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोंढवा बु. भागातील मुख्य रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
- कोथरुडकरांनी दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान – नामदार चंद्रकांत पाटील
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न
- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
- “आशा” योजनेच्या माध्यमातून ७०० हून अधिक रुग्णांवर मोफत जटिल शस्त्रक्रिया करण्यात आल्या, चंद्रकांत दादा पाटील यांची अपोलो प्रतिनिधींशी भेट
- अपोलो हॉस्पिटलचे CEO तसेच वरिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली सदिच्छा भेट