Latest Marathi News

BREAKING NEWS

“शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजारापर्यंत प्रोत्साहन अनुदान दिवाळीपूर्वी जमा होणार” – चंद्रकांतदादा पाटील

राजे विक्रमसिंग घाटगे को-ऑपरेटिव्ह बँकेचे नवीन जागेत हस्तांतर

0

कोल्हापूर |

दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर राजे विक्रमसिंह घाटगे को – ऑप. बँक लि.,कागल. च्या स्थलांतरित मुख्य शाखेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले. नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजारापर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान दिवाळीपूर्वी जमा होणार असल्याची माहिती यावेळी दिली.

त्याबरोबरच चालू शैक्षणिक वर्षापासून पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीत उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट केले. नागरी सहकारी बँकांना केंद्र सरकारच्या सर्व योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही सांगितले.

या कार्यक्रमास सुहासिनी घाटगे, शाहू ग्रूपचे अध्यक्ष समरजितसिंह राजे घाटगे, प्रविणसिंह राजे घाटगे, निवेदिता घाटगे यांच्यासह कागलमधील राजेप्रेमी, कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.