Latest Marathi News

BREAKING NEWS

“ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन..!” चंद्रकांत दादांच्या हस्ते संपन्न

0

कोल्हापूर |

‘करवीर नगर वाचन मंदिर’ आणि ‘कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघ’ यांच्या विद्यमाने कळंबा येथील ग्रंथालय संघाच्या ५३ व्या वार्षिक अधिवेशनाचं उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उद्घाटन केलं. यावेळी राज्यातील मराठी ग्रंथालयांसाठी सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत माहिती दिली.

राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांना २०२३-२४ या वर्षापासून निकषानुसार ६० टक्के अनुदान देण्यात येईल, दर्जावाढीसोबत नवीन ग्रंथालयांनाही मंजुरी देण्यात येईल, त्यांना पहिल्याच दिवसांपासून अनुदान लागू करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी केली. तसंच यासंदर्भातील त्रुटी दूर करुन तीन आठवड्यांत राज्य मंत्रिमंडळ तसा निर्णय घेईल, असंही स्पष्ट केलं.

यावेळी राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, गंगाधर पटणे, प्रा. नाथाजी पाटील, उत्तम कारंडे, राहुल चिकोडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष तानाजी मगदूम, आर. आय. पाटील, भीमराव पाटील, करवीर नगरचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी, डॉ. आशुतोष देशपांडे, मनिषा शेणई, सुनील वायाळ, गुलाबराव मगर, देवानंद पाटील, सोपनराव पवार, विजय पोवार, नंदकुमार मराठे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.