मुंबई |
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. संभाजी भिडे यांना अटक व्हायलाच हवी. त्यांनी जे म्हटलं, हे जर दुसरं कोणी म्हटलं असतं. तर एव्हाना देशद्रोही म्हणून अटक झाली असती. संभाजी हे नाव वापरून ते बहुजनांच्या पोरांना भडकवत आहे, असं छगन भुजबळ म्हणालेत. बहुजनांच्या पोराची डोकी भडकवणाऱ्या संभाजी भिडे यांना त्वरित अटक करावी अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
संभाजी भिडे यांनी भारतीय स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. १५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. याच दिवशी देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे सर्वांनी या दिवशी उपवास करावा. या दिवशी दुखवटा पाळावा, असं संभाजी भिडे म्हणालेत. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे. संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. छगन भुजबळ यांनी ही मागणी केली आहे.