सोलापूर |
सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. गेल्या वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंड करून शिवसेनेमध्ये दोन गट पडले होते. त्यामुळे ठाकरे गटाकडून आता नव्यानं पक्षबांधणीचं काम हाती घेण्यात आलं आहे.
कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशाच्या वेळी जोरदार घोषणाबाजी केली.
भाजपच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हा पक्षप्रवेश येत्या आगामी लोकसभा, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मानला जातो.