Latest Marathi News

BREAKING NEWS

हिरकणी कक्ष दुरवस्थेबाबतच्या सरोज अहिरेंच्या तक्रारीची आरोग्य मंत्र्यांकडून दखल;

0

आमदार सरोज अहिरे आपल्या बाळाला घेऊन अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (सोमवारी) विधीमंडळात दाखल झाल्या मात्र बाळाला ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाची दुरावस्था पाहून त्यांनी अधिवेशन अर्ध्यावर सोडून गेल्याची माहिती समोर आली होती.दरम्यान, सरोज अहिरे यांच्या या कृतीवर आता सरकारकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. तसेच त्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यासाठी आमदार सरोज अहिरे या आपल्या लहान बाळाला घेऊन आल्या होत्या. पण बाळासाठी हिरकणी कक्षाच्या नावावर एक खोली रिकामी करून देण्यात आली, त्यात पुरेशी व्यवस्था देखील नव्हती त्यामुळे त्या अस्वस्थ होऊन त्यांच्या डोळ्यात पाणी आले. नागपूर अधिवेशनात आमदार सरोज अहिरे आपल्या लहान बाळाला घेऊन आल्यानंतर नागपुरात त्यांच्यासाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती.

या अधिवेशनालाही सरोज अहिरे आपल्या लहान बाळाला घेऊन आलेल्या आहेत. परंतु हिरकणी कक्ष खराब असल्याने विधीमंडळातून काढता पाय घेतला आहे.त्यांच्या या तक्रारीची दखल आता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतली आहे.सरोजताईंची तक्रार सार्वजनिक आरोग्य विभाग आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजीराव सावंत यांच्या कानावर जाताच त्यांनी सरोज अहिरेंशी दूरध्वनीहून संपर्क साधला व त्यांना येत्या २४ तासांच्या आत आया, नर्स, डॉक्टर सह सुसज्ज असा हिरकणी कक्ष तयार असेल याची ग्वाही दिली. यातून प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या कर्तव्य तत्परतेबद्दल आज पुन्हा एकदा प्रत्यय आला.

Leave A Reply

Your email address will not be published.