Latest Marathi News

BREAKING NEWS

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चर्चगेटमधील मातोश्री शासकीय वसतिगृहाला भेट देऊन तेथील सोईसुविधांचा घेतला आढावा

0

मुंबई , ०३ नोव्हेंबर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईतील चर्चगेटमधील मातोश्री शासकीय वसतिगृहाला भेट देऊन पाहणी केली. तसेच वसतिगृहातील सोईसुविधांचा देखील त्यांनी आढावा घेतला.

चंद्रकांत पाटील यांनी आज वसतिगृहाची संपूर्ण पाहणी केली. यासोबतच त्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद देखील साधला. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांसोबत देखील पाटील यांनी संवाद साधला. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधांसह अभ्यासासाठी पूरक वातावरण असावे असे त्यांनी यावेळी सूचित केले.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. अशोक गायकवाड, श्री. कांबळे, मातोश्री शासकीय वसतिगृहाचे अधिकारी ,कर्मचारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.