Latest Marathi News

BREAKING NEWS

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर दौऱ्यादरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी दिली सदिच्छा भेट

0

सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यासोबतच दैनिक लोकमतच्या सोलापूर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

चंद्रकांत पाटील यांनी सोलापुर प्रवासात विधीमंडळातील त्यांचे सहकारी सुभाषबापू देशमुख, सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, भाजपा सोलापूर शहर अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या कुटुंबियांशी अनौपचारिक संवाद झाला. यावेळी त्यांच्या कुटुंबियांकडून पाटील यांचे आदरतिथ्य करण्यात आले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर, माजी महापौर कांचनताई यन्नम, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, मोहन डांगरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील यांनी दरम्यान दैनिक लोकमतच्या सोलापूर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी सोलापूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि त्यांच्या टीमशी विविध विषयांवर अनौपचारिक संवाद साधला. यावेळी जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण, मोहन डांगरे हे देखील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.