Latest Marathi News

BREAKING NEWS

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने तांडव, संपूर्ण जिल्हा जलमय

0

सोलापूर : हवामान विभागाने सोलापूर शहर व जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा परिसरात शनिवार दिनांक १७-१०-२०२० पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

बार्शी शहर व तालुका परिसरात अतिवृष्टी झाल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून लोकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. मल्लाप्पा शनशेट्टी रोड परिसरात पावसाच्या तडाख्याने भिंत पडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोलापूर शहर परिसरात देखील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

दरम्यान आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी ०२१७-२७३१०१२ , १०७७ हा टोल फ्री नंबर देण्यात आला आहे. तसेच येत्या शनिवार पर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.