Latest Marathi News

BREAKING NEWS

हलवा आहे का?, ब्रमिष्ठ झाल्यासारखे दोन दिवस बरळताय, बसवराज बोम्मईच्या विधानाचा मनसेने घेतला समाचार

0

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न तापत असताना आता कर्नाटक राज्य सरकारकडून नवी कुरापत सुरू आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर कर्नाटक दावा सांगण्याचा गांभीर्यानं विचार करत असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितलं आहे. बसवराज बोम्मई यांच्या या विधानामुळे आता महाराष्ट्रात विविध प्रतिक्रिया उमटत आहे. यातच आज पुन्हा बसवराज बोम्मई यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

कर्नाटकची एक इंच भूमी कोणाला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कन्नड भाषिक बहुसंख्य असलेले अक्कलकोट आणि सोलापूर हे कर्नाटकात विलीन करावेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं. परंतु त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असं बसवराज बोम्माई यांनी म्हटलं आहे.

बसवराज बोम्माईंच्या या विधानामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील या विधानाचा निषेध केला. “हलवा”आहे का?भ्रमिष्ट झाल्यासारखे कर्नाटक चे मुख्यमंत्री दोन दिवस झाले बरळत आहेत. शिर्डीला सगळ्यात जास्त भाविक आंध्रचे येतात, तर त्यांनी शिर्डी वर अधिकार सांगावा का? आधी जत तालुक्यातील गावे व आज अक्कलकोट आणि सोलापूर बद्दल बेताल वक्तव्य करून उगाच लोकांच्या भावना प्रक्षोभित करत आहेत, असं बाळा नांदगावकर यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.