Latest Marathi News

BREAKING NEWS

“हा व्यक्ती स्वतः वडिलांच्या पेन्शन वर जगतोय” निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

0

मुंबई | राणे कुटुंबीय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसून येत नाहीत सतत कोणत्याही मुद्द्यावरून राणे कुटुंबीय उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसून येतात अशातच राज्यात जुनी पेन्शन योजना सुरु करण्याची मागणी राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांनी केली आहे. याच मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगितुरा रंगला आहे. जुनी पेन्शन सुरु करण्याची मागणी करत राज्यातील १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी याविरोधात संप देखील पुकारला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संप मागे घेण्याचं आवाहनही कर्मचाऱ्यांना केले आहे.

अशातच आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी शिंदे-फडणवीसांवर टीका करताना म्हणाले की, ‘मी आत मुख्यमंत्री असतो तर जुनी पेन्शन योजना लागू केली असती’, असं म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. “हा व्यक्ती स्वतः वडिलांच्या पेन्शन वर जगतोय”, असं म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

“जुन्या पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. सरकारला टाळे ठोकले आहे. सरकारने जुनी पेन्शन लागू करायला काय हकरत आहे? मुख्य म्हणजे सरकारला इतकी मोठी महाशक्ती पाठिशी असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आता निलेश राणे यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे गट काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.