Latest Marathi News

BREAKING NEWS

हा चिपळूणचा डुक्कर, त्याला चिखलात लोळवणारच, निलेश राणेंचा रोष नेमका कोणाकडे ?

0

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी नाव न घेता अत्यंत शेलक्या शब्दात टीका केली आहे. परवा चिपळूणचा डुक्कर कुडाळमध्ये आला. मी त्याला रान डुक्कर म्हणणार नाही. रान डुक्कर जंगलात असतो. तो चांगला असतो. हा चिखलातील डुक्कर आहे. याला एक दिवस चिखलातच लोळवणार नाही तर नावाचा राणे सांगणार नाही. काय लायकी आहे तुझी. तू राणे साहेबांबद्दल बोलणार?, असा संतप्त सवाल निलेश राणे यांनी केला.

निलेश राणे हे कुडाळ येथे एका सभेला संबोधित करताना बोलत होते. यावेळी त्यांनी भास्कर जाधव आणि वैभव नाईक यांच्यावर घणाघाती टीका केली. हा स्वत:ला शेठ समजतो. मी भास्कर शेठ. अरे तुला बघून लोकं गेट बंद करतात. साल्या तू कसला शेठ?, असा हल्ला निलेश राणे यांनी चढवला.

एका कामत्याच्या कोरोना सेंटरमध्ये हे गेले होते. कोरोना पेशंट राहिले बाजूला, याचे आणि डॉक्टरांचेच बोलणे सुरू होते. साहेब ऑक्सिमीटरची गरज आहे. साहेब, रेमिडेसिव्हिरचं औषध आलं नाही… असं डॉक्टर सांगत होते. हे हम्मम.. हम्म करत होते. रेमडेसिव्हिरला तर राबडी म्हणाले. अरे राबडी देवी नाही रे, रेमिडेसिव्हीर आहे ते. तुम्हाला एवढं बोलता येत नाही? अन् तुम्ही राणे साहेबांवर टीका करणार? तुम्ही टीका करणार?त्यांनी रेमेडिसिव्हीर एका झटक्यात बोलून दाखवलं तर काहीही हरेल. हा साला चिपळूणचा वाळू चोर, अशी टीका निलेश राणे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.