Latest Marathi News

BREAKING NEWS

सिद्धेश्वराच्या मंदिरासमोरील रस्ता महानगरपालिकेने स्वखर्चातून पूर्ण करण्याच्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आयुक्तांना सूचना

0

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सोलापूरचे जागृत ग्रामदैवत म्हणजे श्री सिद्धेश्वर, सिद्धेश्वराच्या यात्रेच्या तयारीबाबत त्यांनी माहिती दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, सिद्धेश्वर मंदिर हे एक खूप मोठे श्रद्धास्थान आहे. आता सिद्धेश्वर यात्रेला थोडाच अवधी बाकी आहे. या यात्रेतील सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे अक्षता सोहळा! या सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित राहतात. यानुषंगाने सिद्धेश्वराच्या मंदिरासमोरील एक बाजूचा रस्ता पक्का असून दुसऱ्या बाजूचा रस्ता अद्याप निर्माण झालेला नाही. त्यामुळे तूर्तास महानगरपालिकेने हा रस्ता स्वखर्चातून पूर्ण करण्याची सूचना आयुक्तांना केली आहे. यानुषंगाने सदर रस्त्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून एक कोटी रुपये निधी दिला जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.