Latest Marathi News

BREAKING NEWS

खासदार निंबाळकर यांच्या बैठकीमध्ये नागरिकांनी मांडला समस्येचा पाढा

0

माढा |

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कुर्डुवाडी पंचायत समिती कार्यालय येथे आढावा बैठक घेण्यात आली होती. या आढावा बैठकीत कुर्डूवाडी सह माढा तालुक्यातील अनेक प्रश्न आणि समस्या मांडल्या जनतेच्या समस्या जास्त असल्याने जनता अनावरण झाल्याने पोलिसांना या मध्ये हस्तक्षेप करावे लागले. यावेळी प्रकाश कदम यांनी घरकुल, प्रकाश चोपडे यांनी , खते भ्रष्टाचार ,राहुल मिठारे यांनी ९१७ , प्रॉपर्टी दारांचे प्रश्न, शफीक शेख यांनी रेल्वे वर्कशॉपमध्ये मध्ये नवीन भरती का होत नाही. चिन्कहिल येथील ट्रेनिंग सेंटर येथे पुन्हा ट्रेनिंग सुरू व्हावी अशा अनेक मागण्यांचे प्रश्नांना नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांविषयी तात्काळ कारवाई करावी , स्पॉट भेट देण्यात यावी अशी आदेश खासदार रंजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.

या बैठकीस धैर्यशील मोहिते-पाटील, प्रांताधिकारी ज्योती कदम, गोविंद आबा कुलकर्णी, समाधान दास ,उमेश पाटील, शंकर बागल, प्रवीण टोनपे ,दिलीप बारंगळे, फिरोज खान ,अभिजीत सोलंनकर ,गट विकास अधिकारी संताजी पाटील, तहसीलदार राजेंद्र चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर विलास हिरे ,न पा कुर्डूवाडी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड ,प्रभारी पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे , ग्रामीण रुग्णालय अधिकारी सुनंदा रणदिवे, एम एस सी बी ऑफिसर चव्हाण, आदी सर्व विभागातील अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.