Latest Marathi News

BREAKING NEWS

गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपट करमुक्त करा; या संघटनेने केली मागणी

0

मुंबई | दिग्दर्शक राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘गांधी गोडसे एक युध्द’ हा हिंदी चित्रपट येत्या २६ जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. राजकुमार संतोषी यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटात गांधी व गोडसे या दोघांनाही आप आपली बाजु मांडण्याची संधी दिली आहे, त्यामुळे हा चित्रपट करमुक्त केला जावा, अशी मागणी अमर हुतात्मा हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली आहे.

राजकुमार संतोषी यांच्या म्हणण्यानुसार गोडसेंची बाजु जी आजपर्यंत दाबुन ठेवल्या गेली होती, ती त्यांच्या न्यायालयीन वक्तव्यानुसार चित्रपटात मांडली आहे व गांधीची बाजु देखील मांडल्या गेली आहे. आम्ही आशा करतो की, नाथुरामांची बाजु न्यायालयीन निवेदनाप्रमाणेच मांडली गेली असेल. जर या निवेदनासोबत छेडछाड करून नाथुरामांना ‘खलनायक’ म्हणुन दाखविले गेले असल्यास ‘अमर हुतात्मा हिंदू महासभा’ या चित्रपटाचा तीव्र विरोध करणार व चित्रपटगृहांसमोर निदर्शने करून चित्रपटाचे खेळ बंद पाळण्यात येईल. असा इशाराही संदीप काळे यांनी दिला.

नाथुरामांची बाजु योग्य पध्दतीनं मांडल्या गेली असेल तर ती जास्तीत लोकांसमोर येईल व नाथुराम ‘राष्ट्रप्रेमी’ आहेत हे सत्य बाहेर येईल. असे असल्यास जास्तीत जास्त लोकांना हा चित्रपट पाहता यावा म्हणुन तो ‘करमुक्त’ करावा. अशी मागणी काळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.यावर आता राज्य सरकार काय निर्णय गेले हे पाहिजे लागले. मागच्या काही दिवसांपासून अनेक चित्रपटाला विविध कारणावरून विरोध होताना दिसून येत असून यावर आता अमर हुतात्मा हिंदुमहासभा कशाप्रकारे निर्णय घेते हे पाहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.