Latest Marathi News

BREAKING NEWS

गजानन कीर्तिकर शिंदे गटात जाताच अनिल देसाईंना दिली मोठी जबाबदारी

0

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात जाताच उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आले आहे. कीर्तिकर यांच्याकडे असलेल्या स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष पद शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गजानन कीर्तिकर शिंदे गटात गेल्यानंतर स्थानीय लोकाधिकार समितीचा नेमके काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता.

कीर्तिकर शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. आता त्यांच्याकडून स्थानीय लोक अधिकार समितीचे अध्यक्ष पदही काढून घेण्यात आले आहे. शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानिक लोकाधिकार समिती महासंघ ही मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना आहे. दहा हजारांहून अधिक सदस्य या संघटनेचे आहेत.

लोकाधिकार समिती मुंबई आणि महाराष्ट्रात स्थित विमा, तेल, विमान वाहतूक, रेल्वे, संशोधन, केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांच्या कार्यालयांमध्ये सक्रिय आहे. राज्यातील 80 टक्के नोकऱ्यांमध्ये मराठी भाषिकांना प्राधान्य मिळावे, यासाठी ही समिती काम करते. त्यामुळे स्थानिय लोकाधिकार समितीच्या अध्यक्षपदी ठाकरे कुटुंबाशी निष्ठावाण असलेले खासदारअनिल देसाई यांची नियुक्ती करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.