Latest Marathi News

BREAKING NEWS

“गद्दाराची व्याख्या म्हणजे एकाच्या घरी नांदायचे दुसऱ्याचे मंगळसुत्र घालायचे तिसऱ्याच्या घरी संसार करायचा आणि गर्भ चौथ्याचा वाढवायचा”

0

 

 

शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे बंडखोर आमदार उदय सामंत आणि दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी टीका करताना उदय सामंत यांचा रत्नागिरीचा उपरा आणि केसरकर यांना सिंधुदुर्गाचा बडगा असा उल्लेखल केला आहे.

 

“रत्नागिरीचा उपरा आणि सिंधुदुर्गातील तो बाडगा. दोन्ही शिवसेनेचे बागडा आणि कोडगा. शिवसेनेशी बंडखोरी केलीत आणि बेशरमपणे सांगत आहेत आम्ही शिवसेनेतच आहोत. काल परवा आलेले म्हणतायत मला शिवसेना वाचवायची आहे. रत्नागिरीत असं कारटं जन्माला यावे याची मला लाज वाटते. गद्दाराची व्याख्या म्हणजे एकाच्या घरी नांदायचे दुसऱ्याचे मंगळसुत्र घालायचे तिसऱ्याच्या घरी संसार करायचा आणि गर्भ चौथ्याचा वाढवायचा”, अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली आहे.

 

तसेच “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांनी खूप जवळ केलं. मातोश्रीवर तुम्हाला रश्मी वहिनींनी अन्न देखील खायला घातलं. राजन साळवी यांना मंत्री नाही केलं. पण तुम्हाला मंत्रीपद दिलं. सात वर्षाचे तुमचं शिवसेनेतलं आयुष्य.खोऱ्यांनी फावड्यांनी ओढलात तेव्हा तुम्हाला नाही विचारलं. तुम्हाला मंत्री केलं. आदित्य ठाकरे यांनी सर्वात जास्त विश्वास तुमच्यावर ठेवला.

 

उदय सामंत तुम्हाला भूक लागली म्हणून तुम्हाला आदित्य यांनी भरवले. तुम्ही अन्नाची किंमत का नाही ठेवली? तुम्ही कृतघ्नपणा का केला? माणुसकीला काळीमा फासणारा राजकीय स्वार्थी माणूस या नररत्नाच्या खाणीत निर्माण झाला. बाबासाहेब तुम्ही लिहलेलं संविधान मोडलं जातंय, तोडलं जातंय”, अशी टीका विनायक राऊतांनी यावेळी केली.

 

“पाच हजार कोटींच्या बॅगा भरायच्या आणि महाराष्ट्रात यायचं. प्रत्येकाचा खोका पन्नासचा, आत्तापर्यंत आंब्याचा खोकाच फक्त आपल्याला माहिती आहे. तुम्ही विका आणि खानदान विका, तुम्ही तुमच्या आईला विकायला निघालात. तुम्ही विकला गेलात 40 च्या जागी आम्ही 100 उभे करू. शिवसेनेला नष्ट करणाऱ्या भाजपला तुम्ही साथ देत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.