Latest Marathi News

BREAKING NEWS

‘गदर २’चा बॉक्स ऑफिसवर कल्ला , सनी पाजी’चा चित्रपट चित्रपट पार करणार 300 कोटींचा आकडा

0

स्वतंत्र दिनाच्या आधी ११ ऑगस्टला प्रदर्शित झालेला सानी देओल आणि आमिष पटेल यांच्या गदर २ या चित्रपटाने धुमाकूळ घातला असून अनेक चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. सनी देओलच्या २००१ साली प्रदर्शित झालेल्या गदर चित्रपटाचा हा सीक्वेल असून याच चित्रपटात अमिश पटेल यांची भूमिका अभिनेता स्व. अमरीश पुरी यांनी निभावली होती.

सानी देओल यांच्या डायलॉगने गदर चा पहिला भाग चांगलाच गाजला होता. तर पहिल्या दिवसापासूनच ‘गदर २’ पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे, यासोबतच ‘गदर 2’ रोज नवं विक्रम करत असून अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहे . पहिल्या दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. रिलीजच्या 7 दिवसानंतरही हा ट्रेंड थांबलेला नाही

सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या गदर २ तूफान कमाई करतो आहे. अवघ्या ६ दिवसांत या सिनेमाने २५० कोटीहुन अधिक कमाई केली होती. ७ व्या दिवशीही सिनेमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ७ दिवसाचे सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. सनी देओलच्या ‘गदर 2’ ची जादू जितकी भारतात आहे तितकी परदेशात दिसून येत नाही

भारतात ‘गदर २’ पहिल्याच दिवशी तब्बल 40.10 कोटींचा गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी, तिसऱ्या दिवशी 51.70 कोटी, चौथ्या दिवशी 38.70 कोटी, पाचव्या दिवशी 55.50 कोटी आणि सहाव्या दिवशी 33.50 कोटी रुपयांची कमाई केली. तर सातव्या दिवशी २२ कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. ‘गदर 2’ चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 283.35 कोटींची कमाई केली आहे. ‘गदर 2’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे

‘नगरच्या खासदाराचा आपल्याला पराभव करण्याचा आहे त्यासाठी कामाला लागा’ – उद्धव ठाकरे

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रद्द; ठाकरे गटासह मनसेची राज्य सरकारवर सडकून टीका

Leave A Reply

Your email address will not be published.