Latest Marathi News

BREAKING NEWS

फ्लाईटमध्ये महिलेवर लघुशंका करणाऱ्या व्यक्तीवर होणार मोठी कारवाई

0

एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार घडला होता. एका पुरुष प्रवाशाने एका महिला प्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यामुळे दिल्ली पोलीस या प्रवाशाचा शोध घेत आहेत. न्यूयॉर्क ते नवी दिल्ली फ्लाइटमध्ये मद्यधुंद अवस्थेत एका महिला प्रवाशावर लघवी करणारी व्यक्ती ही मुंबईतली बिझनेसमन आहे.

प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक केली जाईल, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. “हा आरोपी मुंबईचा रहिवासी आहे; पण सध्या तो इतर राज्यात आहे.पोलिसांचं पथक तिथे पोहोचलं आहे,” अशी माहिती दिल्ली पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

एएनआयने दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी प्रवासी मुंबईतल्या मीरा रोड भागातला रहिवासी आहे. तो सध्या मुंबईत नाही. घटनेच्या वेळी फ्लाइटमध्ये उपस्थित असलेल्या सर्व केबिन क्रू मेंबर्सना दिल्ली पोलीस नोटीस देऊ शकतात आणि त्यांना स्टेटमेंटसाठी बोलावू शकतात. याशिवाय, पोलिसांनी पीडित महिलेच्या आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांचीही माहिती मागवली आहे.

पीडितेने एअर इंडियाकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी बुधवारी (4 जानेवारी) गुन्हेगाराविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. आरोपीला पकडण्यासाठी अनेक पथकं तयार केली गेली आहेत. राष्ट्रीय महिला आयोगानं या घटनेची दखल घेऊन एअर इंडियाला पत्र लिहिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.