LIONS CLUB BARSHI ROYAL ” पहला सुख निरोगी काया ” सर्व कुटुंबाची काया निरोगी असेल तर ते घर निरोगी आणि सुखी. हाच उद्देश डोळ्यापुढे ठेवत लायन्स क्लब बार्शी रॉयल व हिरेमठ हॉस्पिटल, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महातपासणी शिबीर (महिला व पुरूष या दोघांसाठी)घेण्यात आले. यात विवीध तपासण्या(CBC,HB , BSLR SUGER,HbA1C ,ECG ,NEUROPATHY, BMD इ.), तज्ञ डॉक्टरांमार्फत (PHYSICIAN, DENTIST,ORTHOPEDIC, OPTHALMOLOGIST इ) तपासणी ,औषधोपचार व तसेच औषधे हे सर्व मोफतआयोजित करण्यात आले. क्लब च्या अध्यक्ष ला वर्षा खांडवीकर,सचिव ला अमृता गुंडेवार,कोषाध्यक्ष ला राजुल कांकरीया , प्रकल्प प्रमुख व सर्व लायन्स सभासदाच्या मदतीने ह्या शिबीराचा तपासणी आलेख ३७१ लाभार्थी पर्यंत ची भरारी घेऊ शकला.नोंदणी संख्या वाढत गेल्याने तपासणी शिबीराची वेळही ९ ते ११.३० ऐवजी ९ ते दु २ अशी वाढविण्यात आली. हिरेमठ हॉस्पिटल चा सर्व स्टाफ , सर्व डॉक्टर यांचे अगदी छान सहकार्य लाभले.या शिबिरामध्ये डॉ. स्नेहल माढेकर, डॉ. कैवल्य गायकवाड, डॉ. मौलाना शेख, डॉ. निनाद माढेकर, डॉ. महेश राऊत, डॉ. गौरी गायकवाड, डॉ. तांबोळी इर्शाद, डॉ. समिता गरुडे, डॉ. सारंग सोमाणी या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. तसेच हिरेमठ हॉस्पिटल चे ऍडमिन ऑफिसर श्री अमित इंगोले तसेच डायरेक्टर डॉ. मिलिंद पाटील आणि डॉ. मयुरी पाटील यांनी व्यवस्थापनात मदत केली. या प्रकल्पासाठी माजी प्रांतपाल MJF ला जीतुभाई माढेकर व रीजन चेयरपर्सन (रीजन १) चे MJF ला राहुल माढेकर हेही उपस्थित होते. या प्रकल्पासाठी क्लब व हॉस्पिटल यांच्यातील महत्वाचा दुवा व प्रकल्प समन्वयक म्हणून डॉ ला निनाद व डॉ ला स्नेहल यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले.तसेच प्रकल्प प्रमुख व नोंदणी प्रमुख म्हणुन ला मीना जैन व ला वैशाली बारबोले यांनीही अथक परिश्रम घेतले. क्लबमार्फत सर्व डॉक्टर्स , नर्सेस , तपासणी साठी आलेले औषध कंपनीचे प्रतिनिधी या सर्वांचे सत्कार क्लब तर्फे करण्यात आले.
BREAKING NEWS
- कौटुंबिक स्तरात शाश्वत आनंद, समृद्धी व आत्मिक समाधान कशात ?
- नागपूरमध्ये विधानभवनात अविनाश सोलवट यांची भेट
- कलियुगात प्रचिती दातृत्वाची.!
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
- मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोंढवा बु. भागातील मुख्य रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन संपन्न
- कोथरुडकरांनी दिलेला विश्वास, दिलेली साथ आणि दाखवलेला स्नेह माझ्यासाठी प्रेरणेचं सर्वात मोठं अधिष्ठान – नामदार चंद्रकांत पाटील
- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न
- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) वर्षातून दोन वेळा घेतली जाणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
- “आशा” योजनेच्या माध्यमातून ७०० हून अधिक रुग्णांवर मोफत जटिल शस्त्रक्रिया करण्यात आल्या, चंद्रकांत दादा पाटील यांची अपोलो प्रतिनिधींशी भेट
- अपोलो हॉस्पिटलचे CEO तसेच वरिष्ठ डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घेतली सदिच्छा भेट