यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससी परीक्षा घेण्याचा नवा पॅटर्न 2025 पासून लागू करण्याच्या मागणीसाठी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आज आंदोलन केलं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करत विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले.याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला आहे. फक्त टिव्हीवर यावं, यासाठीच गोपीचंद पडळकर आंदोलन करत आहेत’ असा टोला रोहित पवार यांनी पडळकरांना लगावला आहे.
रोहित पवार म्हणाले, “विरोधी पक्षात होते, त्यामुळे गोपीचंद पडळकरांना वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याची सवय आहे. व्यक्तिगत हित न पाहता केवळ आपण टिव्हीवर यावं, यासाठी आंदोलन न करता विद्यार्थ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन त्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे.” असं रहित पवार यावेळी म्हणाले आहेत. आज माध्यमांशी बोलताना रोहित पावर यांनी हे विधान केले होते.
बच्चू कडू यांनी ज्या-ज्या कारणांसाठी आंदोलन केले. ते विषय या सरकारमध्ये घेतले जात नाही तर ते विषय दुर्लक्ष केले जात आहे. महत्त्वाच्या विषयात हे सरकार सकारात्मक नसेल आणि जरी बच्चू कडू त्या सरकारमध्ये पदासाठी गेले असले तरी ऑरिजनल बच्चू कडू हे तेथे अस्वस्थ राहणारच, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.