Latest Marathi News

BREAKING NEWS

मोदीजींवरील प्रेम, त्यांची लोकप्रियता पाहून २०२४ मध्येही मा. मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होणार हे वारंवार अधोरेखित होते – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

0

पुणे , १२ ऑक्टोबर : लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते शिरुर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर तालुक्यातल्या नारायण गाव येथे घर चलो अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील सहभाग घेतला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षांसोबत सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधून जनमत जाणून घेतले. यावेळी भेटणारा प्रत्येक नागरिक पुन्हा मोदीजीच पंतप्रधान होणार, हा संकल्प व्यक्त करत होता. मोदीजींवरील प्रेम, त्यांची लोकप्रियता पाहून २०२४ मध्येही मा. मोदीजीच पुन्हा पंतप्रधान होणार हे वारंवार अधोरेखित होत असल्याचे पाटील यांनी म्हटले.

लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत चंद्रकांत पाटील यांनी जुन्नर तालुक्यातील नारायणगांवच्या प्रवासादरम्यान बाळकराम महाराज यांनी स्थापन केलेल्या श्रीरामांच्या मंदिरात जाऊन, प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली.

Leave A Reply

Your email address will not be published.