मनसे नेते आणि मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र दौरा करत आहेत. यादरम्यान नाशिकहुन सिन्नर येथील समृद्धी महामार्गावर अमित ठाकरेंचा ताफा टोलनाका कर्मचाऱ्यांनी अडवला होता. तसेच यावेळी टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा केल्यामुळे मनसे स्टाईलने टोलनाका फोडण्यात आला. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होताच सत्ताधारी भाजपने अमित ठाकरेंवर बोचरी टीका केली होती आता या टीकेला मनसे सुद्धा सडेतोड प्रतिउत्तर दिले आहे.
या संदर्भात मनसे नेते अखिल चित्रे यांनी ट्विट करून थेट भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे, ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की, दुसऱ्यांचे पक्ष फोडणे म्हणजे राजकारण का ? भाजपने इतरांचे पक्ष फोडण्यापेक्षा सामान्य जनतेला नाहक्क त्रास देणारे टोल फोडणे कधीही बरेच.दुसऱ्यांचे पक्ष फोडून विचारधारेला श्रध्दांजली देण्यापेक्षा स्वःकर्तुत्वावर पक्ष वाढवा मग आम्हाला राजकारण शिकवा ! असा टोला लगावला आहे.
प्रकरण असे कि, सिन्नर येथील टोलनाक्यावर फास्टटॅगसंदर्भातील बिघाडामुळे अमित ठाकरेंची गाडी तब्बल गाडी १० मिनिटे थांबवण्यात आली यावेळी तेथील टोल कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची भाषा वापरण्यात आली होती काही वेळाने अमित ठाकरे यांची गाडी निघून गेल्यानंतर स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी थेट टोल नाक्यावर राडा केला होता याच तोल नाक्याच्या प्रकरणावरून मनसे आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे.