Latest Marathi News

BREAKING NEWS

“ज्यावेळी बेईमानी होईल त्यावेळी एकनाथ शिंदे जन्माला येतील” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई |

भिवंडीत आयोजित केलेल्या भाजप पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. ‘जेंव्हा जेंव्हा बेईमानी होईल तेंव्हा तेंव्हा कूटनीती करावी लागते. दोन दोन पक्ष फोडले असा आरोप विरोधक करत आहेत. मात्र हा जनाधराचा अपमान कोणी केला. पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतात पण बेईमानी कुणी केली. ज्या ज्या वेळी अन्याय होईल तेव्हा एकनाथ शिंदे हे जन्माला येतील. ‘

उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, ‘शिवसेनेसोबत आमची भावनिक युती आहे. एका विचाराने एकत्र आलो आहोत. कर्णाचे कवच कुंडल काढून घेतल्याशिवाय त्याला मारता येणार नाही. मग कृष्णाने काय काय केले. भीष्मावर हल्ला करण्यासाठी शिखंडीला समोर आणले. त्यावेळी नरो वा कुंजरो वा ही कूटनीती सद्या उद्धव ठाकरे गट करीत असल्याची जहरी टीका केली.

शेवटी आपल्या भाषणात भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, योग्य प्रकारे जागा वाटप करून, भाजपाचे 152 प्लसचे स्वप्न पूर्ण करण्याएवढ्या जागा पक्षाला मिळतील. सोबत असलेल्यांना दगा न देता त्यांना सुध्दा निवडून आणू. तसेच दुष्काळ मुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार, नदी जोड प्रकल्प राबवणार त्यासाठी दीड लाख कोटी खर्च करणार आहे. अडीच वर्ष अन्याय सहन केला. भाजपा कार्यकर्ते ठाम होते. तुम्ही मान्यता दिली म्हणून मी नेता झालो. त्यामुळे मी या पक्षासोबत कार्यकर्त्यांना सोबत उत्तरदायित्व ठेवून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.