अजित पवारांच्या शपथविधीनंतर बहुतांश आमदार अजित पवारांबरोबर आहेत तर काही आमदार शरद पवार यांच्याबरोबर आहेत. याच दरम्यान, काही आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीशी बंडखोरी करत भाजपा-शिवसेनेने (शिंदे गट) स्थापन केलेल्या सरकारमध्ये प्रवेश केला आहे. या शपथविधीवेळी अजित पवार आणि त्या आठ आमदारांसह पक्षातील अनेक नेते, आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी राष्ट्रवादीचे अकोले विधानसभेचे आमदार किरण लहामटेही उपस्थित होते. त्यामुळे सुरुवातीला ते अजित पवार गटात असल्याचं बोललं जात होतं. परंतु आता ते तटस्थ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा >>‘पक्षावर दावा कारण्याइतपत अजित पवारांना अक्कल नाही’
हे ही वाचा >>मोदी-शहा यांनी लिहून दिलेल्या स्क्रिप्टनुसार महाराष्ट्रात राजकीय फोडाफोडी – नाना पटोले
नुकतेच राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.आमदार सुनील शेळके काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांना म्हणाले, सत्तेत सहभागी होण्यापूर्वी शरद पवार साहेबांना विचारायला आम्ही जावं, असंही आम्हाला वाटत होतं. परंतु तिथे (सत्तेत जाण्याचा निर्णय झाला त्या चर्चेवेळी) सुप्रिया ताईसुद्धा होत्या. प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ हे सर्व वरिष्ठ नेतेही तिथे हजर होते. या सर्वांनीच जर हा निर्णय घेतला असेल तर तो निर्णय योग्यच असेल, असं आम्हाला वाटतं.