Latest Marathi News

BREAKING NEWS

पत्रकाराचा जीव वाचविणारे बार्शीचे डॉ. अमित व सुमित पडवळ बंधू!

0

बार्शी, दि – वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिकता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची चिंता समाजात व्यक्त होत असतानाच पत्रकार हर्षद लोहार या तरुण पत्रकारावर ओढवलेल्या अनपेक्षित ब्रेन हॅमरेज संकटात त्यांच्या जीवाचा धोका टाळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या श्री भगवंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलचे संचालक मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. अमित पडवळ आणि त्यांचे बंधू डॉ.सुमित यांनी बजावलेली भूमिका कौतुकास्पद आहे.त्यांच्या या कामगिरी बद्दल राज्यातील पत्रकारांच्यावतीने डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी डॉ.पडवळ बंधूंचे आभार मानले.
हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता कक्षात डॉ. अमित पडवळ यांच्या समवेत पत्रकार हर्षद लोहार यांची राजा माने यांनी भेट घेतली. डॉ.पडवळ यांनी सामाजिक कर्तव्य भावनेतून घेतलेली काळजी व केलेल्या उपचाराबद्दल माने यांनी आभार मानले.प्रतिबिंब प्रतिष्ठानच्यावतीने हर्षद लोहार यांना मदत करण्यात येईल असे सांगितले. डॉ. पडवळ यांनी हर्षद लोहार यांच्यावर सुरु असलेले उपचारांची माहिती दिली.यावेळी भूलतज्ज्ञ डॉ. सत्यनारायण गायकवाड, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय सहसंघटक मुरलीधर चव्हाण, बार्शी तालुका अध्यक्ष गणेश शिंदे,राज्य प्रसिद्धी प्रमुख धीरज शेळके, सिद्धार्थ बसवंत आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.