Latest Marathi News

BREAKING NEWS

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची तालुका कार्यकारिणी बैठक बार्शी येथे संपन्न..!

0

हिंदवी समाचार : बार्शी, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजा माने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सबंध महाराष्ट्रभर डिजिटल मीडिया च्या प्लॅटफॉर्मवर पत्रकारिता करणाऱ्या सर्व संपादक व पत्रकार बांधवांसाठी एक हक्काचे व्यासपीठ असलेल्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची बार्शी तालुका कार्यकारिणी बैठक नुकतीच हिंदवी समाचार च्या कार्यालयामध्ये घेण्यात आली.

सदरील बैठक संघटनेचे महाराष्ट्र राज्य संघटक मुरलीधर चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अजय पाटील व सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तर संघटनेचे बार्शी तालुका अध्यक्ष दिनेश मिटकरी यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

या बैठकीमध्ये विविध महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा होऊन त्यावर अंमलबजावणी करण्याचे निर्णय सर्वानुमते घेण्यात आले. येणाऱ्या काळामध्ये संघटनेच्या वाढीसाठी व सामाजिक उपक्रम घेण्याबाबत काही महत्त्वपूर्ण बाबींवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान बार्शी शहर व तालुक्यामध्ये डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या नवनिर्वाचित 10 सदस्यांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये शंकर गव्हाणे, श्रीशैल माळी, गणेश शिंदे, किरण माने, अभिजीत शिंदे, अक्षय बारंगुळे, सचिन साळवे, सिद्धार्थ बसवंत, वैशाली ढगे, अपर्णा दळवी, प्रतिज्ञा गायकवाड यांचा बार्शी तालुका कार्यकारणी मध्ये समावेश करण्यात आला. संघटनेचे राज्य संघटक मुरलीधर चव्हाण यांनी नवनिर्वाचित सर्व सदस्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी राज्य संघटक मुरलीधर चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अजय पाटील यांनी उपस्थित सर्व सदस्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपामध्ये तालुकाध्यक्ष दिनेश मिटकरी यांनी बार्शी कार्यकारिणीच्या कार्याचा आढावा देत सर्व समावेशक कार्यप्रणाली चालू असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी मागील सभेचा इतिवृत्तान्त व प्रास्ताविक संघटनेचे तालुका सचिव धिरज शेळके यांनी केले तर जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे यांनी आभार मानले. याप्रसंगी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष अमीन गोरे, कोषाध्यक्ष विक्रांत पवार, कार्यकारणी सदस्य रमण कारंजकर, विकी गोंदकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.