Latest Marathi News

BREAKING NEWS

“..तर राजकारण सोडेन, “राणा जगजितसिंह पाटलांचं निंबाळकरांना खुलं आव्हान

0

धाराशिव :  धाराशिव लोकसभा मतदारसंघात सध्या आरोप-प्रत्यारोपांवरून राजकारण चांगलचं तापलं आहे. प्रेरणा ट्रस्टच्या मेडिकल कॉलेजमधील रूग्णांच्या उपचारावरून आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि खासदार ओमराजे नाईक निंबाळकर यांच्यात नवा वाद सुरू झाला आहे. यावरूनच आता राणाजगजितसिंह पाटील यांनी निंबाळकरांना मोठं आवाहन दिलंय.

धाराशिवला १९९३ साली मेडिकल कॉलेज मंजूर झालं होतं. असा दावा ओमराजे निंबाळकर यांनी केला होता. त्यावर  याठिकाणी मेडिकल कॉलेज मंजूर झालं आणि इथलं मेडिकल कॉलेज मुंबईला नेलं, असं काही झालं असेल तर त्यांनी पुरावा सादर करावा. हे सिद्ध केलं तर मी राजकारण कायमचं सोडून देतो. निंबाळकर हा खोटारडा असून त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केलेत.

दरम्यान,  याच मेडिकल कॉलेजमध्ये भाजपच्या काळात 2012 मध्ये 24 लोकांवर 25 शस्त्रक्रिया झाल्या.  तर 2016 मध्ये 16 लोकांवर 138 शस्त्रक्रिया झाल्या. तसेच 2014 मध्ये 9 रुग्णांवर 80 शस्त्रक्रिया झाल्या होत्या. असा आरोप धाराशिव लोकसभा मतदारसंघातील माहाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पती राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर केला होता.

त्यावर  एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा आहे. अनेक ‘शस्त्रक्रिया’ नाही तर अनेकदा ‘उपचार’ झाले आहेत. एकतर त्याला काही कळत नसेल किंवा पुन्हा खोटं बोलत असेल, अशा शब्दात भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

पुढे बोलतांना राणा जगजितसिंह पाटील म्हणाले की, आपण शस्त्रक्रिया असा शब्द वापरत नाही तर उपचार असा शब्द वापरतो. समजा मी किडनीचा पेशंट आहे तर मला आठवड्याला डायलिसिस करावं लागतं. जर माझ्यावर दहा वेळा डायलसीस झाले तर माझ्यावर दहावेळा शस्त्रक्रिया झाली असं म्हणायचं का? ओमराजे यांना यातलं काही कळत नाही, किंवा खोटं बोलतोय, अशी टीका राणा जगजितसिंह पाटील यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.