Latest Marathi News

BREAKING NEWS

दाऊदच्या अनुयांयाबरोबर गेलात तेव्हाच हिंदुत्व सोडलंत; महाजनांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टिका

0

 

मुंबई | शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर यावर्षी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शिंदे गट या दोन्ही गटांचा दसरा मेळावा पार पडला. आता या दोन्ही सभांकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर टीका केली.

आम्ही भाजपला सोडले म्हणजे हिंदत्व सोडले असं होत नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व असं नाही.तुम्ही अगोदर देशातील महागाईवर बोलले पाहिजे, अशी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. या टीकेला आज शिंदे गटात मंत्री असलेले आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मंत्री गिरीष महाजन यांनी प्रत्युत्तर दिले.

“आम्ही अगोदरही सांगितले आहे, भाजपला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले असं नाही. तुम्ही दाऊदच्या अनुयायांच्या मांडीला मांडी लावून बसलात. काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर तुम्ही गेलात तेव्हाच तुम्ही हिंदुत्व सोडले आहे. पंतप्रधान मोदींचा फोटो लावून तुम्ही मत घेतली आहेत. तुम्ही आता भावनिक होऊन लोकांना भुलवू शकत नाही, असं प्रत्युत्तर भाजपचे नेते मंत्री गिरीष महाजन यांनी दिले.

विधानसभा निवडणुका तुम्ही भाजपसोबत लढलात. निकाल हाती आल्यानंतर तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन केले. राज्यातील लोकांना हे पटलेल नव्हत. महाराष्ट्रातील लोक आणि शिवसैनिक आता तुमच्यासोबत राहिलेले नाहीत, असंही मंत्री महाजन म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.