Latest Marathi News

BREAKING NEWS

दसरा मेळाव्यादिवशी मुंबईत वाहतूक कोंडीची शक्यता, दोन्ही गटांकडून हजारो बस आरक्षित

0

 

शिवसेना कोणाची? यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात न्यायालयीन लढाई सुरू असतानाच मुंबईत ऐतिहासिक दसरा मेळावा साजरा होणार आहे. या मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शनासाठी दोन्ही गटांची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा बेकीसी मैदानार होणार आहे. दरम्यान या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने तीन हजार, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने १४०० खासगी बस आरक्षित केल्या आहेत.

शिंदे-उद्धव ठाकरे यांच्या अटीतटीच्या सामन्यामुळे यंदाचा दसरा मेळावा अतिशय मोठा होणार असून बस मालकांची दिवाळी होणार आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांसोबतच सर्वसामान्य नागरिकही उत्सुक असतात. मात्र यंदाचा दसरा मेळावा काहीसा वेगळा असणार आहे. कारण शिवसेनेत दोन गट आहेत. दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्यात शक्तिप्रदर्शन करून आपणच मूळ शिवसेना असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेशासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ, खान्देश येथून मुंबईत येण्यासाठी खासगी बसगाड्यांचं आरक्षण करण्यात आलं असल्याची माहिती राज्यातील खासगी बस मालकांनी दिली आहे.मुंबईत दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच बुधवारी दुपारपर्यंत या गाड्या पोहोचतील. 500 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असलेल्या ठिकाणांवरील गाड्या मंगळवारी रात्रीच मुंबईच्या दिशेने रवाना होतील आणि बुधवारी याठिकाणी पोहोचतील.

तसेच मुंबई महानगर प्रदेशातील वाहनं बुधवारी सकाळी नियोजित सभास्थळासाठी रवाना होतील. मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार?मुंबई शहरात पार्किंगची मोठी समस्या आहे. त्यातच एकाच दिवशी हजारो बस मुंबईत दाखल होणार असल्याने दसऱ्याला प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची भीती आहे. यामुळे नियोजित सभास्थळापासून थोड्या दूर अंतरावर या गाड्या उभ्या राहतील. सभा संपताच गंतव्य स्थानासाठी या गाड्या रवाना होतील, असं खासगी बस चालकांनी सांगितलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.